...अन्‌ तर्डोबाचीवाडीतील रेणुकाने लावली लाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

‘नेहमीप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील मुलांना मी खाऊ देत होते. त्या घोळक्‍यातील एक चिमुकली पुढे आली अन्‌ म्हणाली, ‘मॅडम... मला पुढच्या येळी लाली आणा.’ तिच्याकडे पाहताच मला धक्का बसला. तिचा वरचा ओठ मध्यभागी दुभंगला होता. त्यामुळे तिचा चेहरा काहीसा कुरूप दिसला. काही कालावधीनंतर तिच्या ओठावर शस्त्रक्रिया केली अन्‌ तिला आपलं गमावलेलं सौंदर्य लाभलं, ’’असे तेजस्विनी फाउंडेशन संस्थेच्या संस्थापिका वैशाली चव्हाण सांगत होत्या.

टाकळी हाजी - ‘नेहमीप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील मुलांना मी खाऊ देत होते. त्या घोळक्‍यातील एक चिमुकली पुढे आली अन्‌ म्हणाली, ‘मॅडम... मला पुढच्या येळी लाली आणा.’ तिच्याकडे पाहताच मला धक्का बसला. तिचा वरचा ओठ मध्यभागी दुभंगला होता. त्यामुळे तिचा चेहरा काहीसा कुरूप दिसला. काही कालावधीनंतर तिच्या ओठावर शस्त्रक्रिया केली अन्‌ तिला आपलं गमावलेलं सौंदर्य लाभलं, ’’असे तेजस्विनी फाउंडेशन संस्थेच्या संस्थापिका वैशाली चव्हाण सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर्डोबाचीवाडी (ता. शिरूर) येथील भिल्ल वस्तीवर अंगणवाडी आहे. या वस्तीवरील प्रकल्प स्वावलंबन अंतर्गत चव्हाण अंगणवाडी व भिल्ल समाजातील महिलांसाठी काम करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ओठ दुभंगलेली विद्यार्थिनी रेणुका हिच्या जीवनात झालेला बदल विशद केला.      

रेणुका विठ्ठल धुळे (वय ६) ही तर्डोबाचीवाडीच्या अंगणवाडीत शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार असलेली रेणुका नेहमी मुलांसोबत हसत रहायची. पण तिचा जन्मतः ओठ दुभंगलेला होता. वरचा ओठ नसल्यामुळे तिचा चेहरा वेगळाच दिसायचा. त्यामुळे मुलेदेखील तिला चिडवत. तिने लिपस्टिकची मागणी केल्याने मन भरून आले. यामुळे या मुलीच्या ओठावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्‍चित केले. शिरूर येथील माणिकचंद धारीवाल रुग्णालयात मोफत प्लॅस्टिक सर्जरी करण्याचे शिबिर आयोजित केले होते. तेथे भेट देऊन माहिती घेतली. भिल्ल समाजातील अज्ञानी कुटंब असल्याने त्यांना समजाविण्याची कठीण परीक्षा करावी लागली. रेणुकाचे आईवडील, आजी-आजोबा शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. २२ डिसेंबर २०१८ चा दिवस होता. रेणुकाने प्रत्येक शारीरिक चाचणीला चांगला प्रतिसाद दिला. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर एक महिना तिला ती जखम सांभाळावी लागली. त्यानंतर ती बरी झाली आहे. आता ती आनंदाने ओठांना लाली लावते. शस्त्रक्रियेमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: renuka dhule surgery on lips success