खेड घाटातील तुटलेले क्रॅश बॅरिअर दुरूस्तीचे काम सुरू

Repair work of broken crash barrier in Khed Ghat started
Repair work of broken crash barrier in Khed Ghat started

सातगाव पठार : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील खेड घाटात चार दिवसांपुर्वी एका ट्रकच्या अपघातात घाटातील दरीच्या बाजूला असलेले लोखंडी क्रॅश बॅरीअर पुर्णपणे तुटून गेले होते. सार्वजनीक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत हे क्रॅश बॅरिअर त्वरीत दुरूस्त करण्याचे काम सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे खेड घाटातून देखील वाहतूक वाढली आहे. चार दिवसांपूर्वी खेड घाटात पहाटेच्या वेळेस एक ट्रक दरीच्या बाजूला पुर्णपणे उलटा झाला होता. जेथे हा ट्रक उलटला तेथे लोखंडी क्रॅश बॅरीअर लावलेले होते. त्यामुळे हा ट्रक दरीत न कोसळता तेथेच क्रॅश बॅरिअरला अडकून राहीला. मात्र यात हे क्रॅश बॅरिअर पुर्णपणे तुटून गेले. त्यामुळे पुन्हा जर या ठिकाणीच अपघात झाला तर, वाहन सरळ दरीत जावून पडेल. त्यामुळे सार्वजनीक बांधकाम विभागाने या गोष्टीची त्वरीत दखल घेत हे तुटलेले क्रॅश बॅरिअर लगेचच बसविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे या ठिकाणचा अपघातांचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

खेड घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत. या नागमोडी वळणांवर वाहने नादुरूस्त होऊन बंद पडली की, खूप वेळ वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मात्र, आता या घाटासाठी नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम लवकरच पुर्ण होणार असल्याने घाटातील सर्व वाहतूक नवीन बाह्यवळण रस्त्याने सुरू होईल. त्यामुळे वाहनचालकांना आता नवीन बाह्यवळण रस्ता कधी सुरू होतो याचेच वेध लागले आहेत. मात्र, तुर्तास तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील क्रॅश बॅरिअर तत्परतेने दुरूस्त करण्याचे काम हाती घेतल्याने वाहनचालक व प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com