मुळा नदी किनारालगतच्या रस्त्याची दुरूस्ती सुरू

रमेश मोरे
शुक्रवार, 18 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा रस्त्यावरील मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले चर व त्यावर टाकण्यात आलेली खडी पालिका प्रशासनाकडुन डांबर टाकुन बुजविण्यात आल्याने रस्ता रहदारीसाठी सुरू झाला आहे.

गेली तीन चार महिन्यांपासुन हे काम सुरू होते.यामुळे नागरीकांना धुळ,माती व खड्ड्यांमधुन रहदारी करावी लागत होती. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल होऊन गाड्या घसरणे, गाड्या रूतुन बसणे असे प्रकार घडत होते. तर काम सुरू असताना येथील पवनानगर, संगमनगर, जयमाला नगर, आदी भागातील नागरीकांना लांबच्या रस्त्याने ये जा करावी लागत होती.हा रस्ता पुणे औंधकडे जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या, प्रमाणावर वहातुक असते.

याचबरोबर या रस्त्यावर शाळा असल्याने हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो.याबाबत मंगळवार ता.१५ "पावसाळ्यापुर्वी रस्त्यांची कामे पुर्ण करावी" या शिर्षकाखाली सकाळ मधुन सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका स्थापत्य विभागाकडुन येथील रस्त्याची डागडुजी केल्याने तुर्तास हा रस्ता रहदारीसाठी खुला झाल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: repairing of road behind mula river