सांगवीतील वेताळ महाराज उद्यानात दुरूस्तीची कामे सुरू

रमेश मोरे
शुक्रवार, 18 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील पवना नदी तिरावर असलेल्या वेताळ महाराज उद्यानात अखेर पालिका उद्यान विभागाकडुन दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. येथील स्वच्छतागृहाची दुरावस्था, तुटलेले गेट, उद्यानात येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, परिसर अस्वच्छता याबाबत बुधवारी (ता.16) सकाळमधून "वेताळ महाराज उद्यानाची दुरावस्था, या शिर्षकाखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत येथील दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

उद्यानाचे मागील तुटलेले गेट बसविण्यात आले आहे. तर प्रमुख गेटवर रंगरंगोटी करून वेताळ महाराज उद्यानाचा नाव टाकण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी काम सुरू करण्यात आले असुन स्थापत्य विभागाकडुन स्वच्छतागृहाच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. तर उद्यानात नविन बाके बसविण्यात येणार असल्याचे उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल  यांनी सांगितले.

Web Title: repairing of toys in vetal maharaj garden in sangavi