पाचवी ते आठवी नापासांसाठी फेरपरीक्षा - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे -  ‘‘शिक्षण हक्क कायद्यात केलेल्या दुरुस्ती विधेयकानुसार पाचवी ते आठवी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार असून, याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत,’’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘‘पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नसल्यामुळे आठवीच्या मुलांना पाचवीचा धडा वाचता येत नाही. सातवीच्या मुलांना चौथीचा धडा वाचता येत नाही. विद्यार्थ्यांसह पालकांनाही पास होण्याची खात्री असल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, याकरिता हा बदल केला आहे. हे विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर झाले असून, राज्यसभेतही मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. देशातील २५ राज्यांत आता पाचवी ते आठवी नापासांसाठी फेरपरीक्षा होणार आहे. मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मे महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. त्या परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसविण्यात येईल. त्‍याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत.’’ 

मसुदा अंतिम टप्प्यात 
विद्यापीठ अनुदान आयोग रद्द करून उच्च शिक्षण आयोग आणला जात असला, तरीही त्यात सरकारीकरण, केंद्रीकरण, नोकरशाही नसेल. उच्च शिक्षण आयोगाबाबत आतापर्यंत दहा हजार सूचना आल्या आहेत. नव्या आयोगाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. तो लवकरच सादर केला जाईल. याबाबत लोकसभेत सोमवारी एका प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे असल्याने त्यावर फारसे बोलता येणार नाही, असे जावडेकर म्हणाले.

Web Title: repeat exam of the fifth to the eighth says prakash javadekar