पुण्याची आरोग्य यंत्रणा कारभाऱ्याविनाच; आरोग्य प्रमुख डाॅ. हंकारेंची अखेर बदली

पुण्याची आरोग्य यंत्रणा कारभाऱ्याविनाच; आरोग्य प्रमुख डाॅ. हंकारेंची अखेर बदली

पुणे : कोरोनाची साथ पसरत असतानाच महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाच राज्य सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश काढला. मात्र, त्यांच्या जागी कोणत्याही दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. दुसरे प्रतिनियुक्तीवरील आरोग्य प्रमुख डॉ. नितीन बिलोलीकर हे सुध्दा सुट्टीवर असल्याने ऐन साथीच्या आजाराच्या काळात पुणे शहराची आरोग्य यंत्रणा "कारभाऱ्या'विनाच सुरू राहण्याची शक्‍यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढचा गोंधळ वाढला आहे. महापालिकेतील आरोग्य प्रमुखपदावर डॉ. हंकारे यांची 25 सप्टेंबर 2018 मध्ये प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. ती पुढच्या दोन वर्षांसाठी असल्याचे राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या प्रतिनियुक्तची मुदत संपली असून त्यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. आता कोणत्या नव्या आरोग्य प्रमुखाची नेमणूक होईल, याची उत्सुकता आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या काळात डॉ. बिलोलीकर यांची गेल्या अडीच महिन्यांपासून दुसरे आरोग्यप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही 15 दिवसांत त्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून ते वैद्यकीय रजेवर आहेत.

दरम्यान, याच काळात डॉ. हंकारेही आजारी असल्याने सुट्टीवर होते. त्यामुळे काही दिवस आरोग्य प्रमुखाची जबाबदारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे होती. मात्र, डॉ. बिलोलीकर यांची अजूनही सुट्टीच आहे; तर हंकारे यांची बदली झाल्याने नव्या आरोग्य प्रमुखाच्या नेमणुकीकडे लक्ष लागले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com