तोलाईची जुनी पद्धत योग्य, पण काही बदल होणार, अहवालावर लगेच अंमलबजावणी

प्रविण डोके
Thursday, 9 July 2020

राज्यातील माथाडी आणि हमाल कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यात निसर्ग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, बैठकीला अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, हमाल आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, राजकुमार घायाळ, विकास मगदूम, संतोष नांगरे, हनुमंत बहिरट उपस्थित होेते.​

मार्केट यार्ड (पुणे): राज्य शासनाने तोलाई प्रश्नांबाबत समिती नेमली होती. या समितीने शासनाला अवहाल सादर केला आहे. त्या समितीने तोलाई बाबत जुनी पद्धत योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. फक्त त्यामध्ये काही बदल केले पाहिजे असे सांगितले आहे. तो तोलाई अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे. यावर लगेच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

धक्कादायक! पुण्यात 42 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू; पुन्हा ‘गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळालेच नाही

राज्यातील माथाडी आणि हमाल कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यात निसर्ग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, बैठकीला अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, हमाल आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, राजकुमार घायाळ, विकास मगदूम, संतोष नांगरे, हनुमंत बहिरट उपस्थित होेते.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

पाटील म्हणाले, ''तोलाई पावती ही चार पद्धतीने दिली जाते. बाजारात पॅकिंग माल येतो. त्यामुळे त्याला तोलाईची गरज नाही अशी काही व्यापाऱ्यांची मागणी होती. त्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे. त्यावर लगेच अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच याला निर्णयाला मंत्री मंडळाच्या परवानगीची गरज नसणार आहे.''

Image may contain: 1 person, outdoor

गेल्या अनेक दिवसांपासून पॅकिंग मालावर तोलाई घेऊ नये म्हणून चेंबरची मागणी आहे. त्यावर कामगार संघटना आणि चेंबरचा वाद चालू आहे. त्यांनतर चेंबर या प्रश्नी उच्च न्यायलयात गेले होते. जानेवारी महिन्यात उच्च न्यायालयाने समिती नेमून चार आठवड्यात यावर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने सुनील पवार समिती नेमली होती. या समितीने तोलाई बाबत अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला आहे. परंतु या अहवालावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. 
 

Edited by : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report about Mathadi and Hamal accepted implementation will be immediately said Balasaheb Patil