जुन्नरला संभाजी ब्रिगेडचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

junnar
junnar

जुन्नर - श्री समर्थ रामदास स्वामी, संतांचे जीवन, सदगुणांच्या गोष्टी  ही पुस्तके जुन्नर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

याबाबतचे निवेदन जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाकधिकारी पांडुरंग मेमाणे यांना  देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश वाजगे, उपाध्यक्ष प्रणीत डोंगरे, जिल्हा संघटक संजय वाजगे, जिल्हा कार्याध्यक्ष गौतम डावखर, सौरभ ढवळे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील ढोबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्तिथ होते. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात छत्रपती संभाजी महाराज, जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे बद्दल घृणास्पद व बदनामीकारक लेखन केल्याबद्दल सर्व शिवप्रेमी,वारकरी व छत्रपतींचे अनुयायी दुःखी झाले आहेत. लेखक डॉ शुभा साठे, गोविंद तळवळकर, डॉ प्रभाकर चौधरी यांच्या श्री समर्थ रामदास स्वामी, संतांचे जीवन, सदगुणांच्या गोष्टी या पुस्तकाचे वितरण झाल्यास मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com