हायपरलूप ट्रॅकचा अहवाल महिनाअखेरीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - मुंबई-पुणेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या पंधरा किलोमीटर लांबीचा पहिल्या ‘डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’चा पूर्व व्यवहार्यता पडताळणी अहवाल (प्री-फिझिबिलिटी रिपार्ट) महिनाअखेरीस पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) प्राप्त होणार आहे. दरम्यान, संबंधित कंपनीबरोबर करार करण्यासाठी कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा ‘हायपरलूप’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे. त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. मुंबई-पुणेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर पंधरा किलोमीटर लांबीचा पहिला ‘डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारण्यात येणार आहे. 

या प्रकल्पासाठीचा व्यवहार्यता पडताळणी अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारकडे मान्यतेला पाठविण्यात येईल.त्‍यानंतर संबंधित कंपनीबरोबर कायदेशीर करार करणे, आर्थिक आणि तांत्रिक माहिती घेण्यासाठी पीएमआरडीएकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. चार कंपन्यांनी या निविदा भरल्या आहेत. 

पंधरा किलोमीटरचा ट्रॅक उभारण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. हा ट्रॅक डेमन्स्ट्रेशन ट्रॅक असणार आहे. संबंधित कंपनीकडून महिनाअखेर अहवाल प्राप्त होणार आहे. त्याचदरम्यान आम्ही आर्थिक, कायदेशीर आणि तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या होत्या. चार कंपन्यांचा त्याला प्रतिसाद मिळाला आहे.

- किरण गित्ते,  आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Report of hyperlip track by month-end