'नॅड'ला माहिती देण्यासाठी डिसेंबर अखेरची मुदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे : विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने 'नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी' (नॅड) या संकल्पनेतून काम सुरू केले आहे. ज्या विद्यापीठांनी नवी व जुनी माहिती दिली नसल्यास ती त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत सादर करावी, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली. आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त संस्थांनी करार केला आहे.

केंद्र सरकारने "यूजीसी'च्या माध्यमातून देशभरातील इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स, केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांसह सेवास्तर करार (सर्व्हिस लेव्हल ऍग्रिमेंट) केले आहेत.

त्याअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 106 संस्थांनी हा करार केला. मात्र, अनेक विद्यापीठांकडून माहिती आली नाही. त्यामुळे विद्यापीठांनी 'नॅड'ला प्रतिसाद वाढविण्यासाठी विद्यापीठांमध्ये नॅड कक्ष सुरू करावा, समन्वयकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांकडून नॅडच्या संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यावी, प्रवेश आणि परीक्षा अर्जांमध्ये 'नॅड' ओळखपत्रासाठी स्वतंत्र जागा असावी, तसेच "नॅड' ओळखपत्रासाठी विद्यार्थ्यांचे ई-मेल आणि मोबाइल क्रमांक घ्यावेत, अशी सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Report NAD deadline in December

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: