उजनीतील प्रदूषणाबाबत पर्यावरण विभागाने दिला 'हा' आदेश

sakal-impact
sakal-impact

भिगवण - उजनी धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे व त्यामुळे जैवविविधता धोक्‍यात येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे प्रशासनाला जाग आली आहे. उजनी प्रदूषणाबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश पर्यावरण विभागाचे अतिरिक्त सचिव चंद्रकांत विभूते यांनी दिला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मैलायुक्त पाणी तसेच नदीकाठच्या औद्योगिक वसाहतीमधून नदीपात्रात थेट सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे उजनी जलाशयातील पाणी प्रदूषित होत असल्याची व त्यामुळे पिण्याच्या पाणी योजनांसह जलाशयातील जैवविविधता धोक्‍यात येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमर एकाड यांनी याबाबत पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर विभूते यांनी प्रदूषण मंडळ, आयुक्त पुणे महानगरपालिका, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी पुणे व उपसचिव जलसंपदा विभाग यांना नोटीस काढली आहे. 

‘सकाळ’मध्ये उजनी जलाशयातील पाण्याच्या प्रदूषणाबाबतची गंभीर स्थितीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत सर्व स्तरांमध्ये जागृती झाली. पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त सचिवांकडे तक्रार करून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळाला असून प्रदूषणास जबाबदार घटकांना नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत यापुढेही पाठपुरावा केला जाईल. 
- अमर एकाड,  सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com