Padma Bhushan Award : शास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण

सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ आणि मितभाषी व्यक्तित्व डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला
republic day 2023 Padma Bhushan Award to Scientist Dr Deepak Dhar
republic day 2023 Padma Bhushan Award to Scientist Dr Deepak Dhar sakal

पुणे : सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ आणि मितभाषी व्यक्तित्व डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहे. 

वैज्ञानिक जगतात अत्यंत प्रतिष्ठेचं मानले जाणारे बोल्ट्झमन मेडल डॉ. दीपक धर यांच्या रूपाने प्रथमच भारताला प्राप्त झाले होते. परदेशात नोकरीच्या अनेक संधी खुणावत असतानाही ८०च्या दशकात भारतात परतत डॉ. धर यांनी अनुभवाच्या जोरावर एक नंव संशोधन क्षेत्र खुले केले. आता त्यातच पद्मभूषण सन्मानाने त्याच्या कर्तृत्त्वात अजून एक  मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मूळ उत्तर प्रदेशमधील प्रतापगडचे असणाऱ्या प्रा. धर यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद विद्यापीठ आणि 'आयआयटी, कानपूर' येथून झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (कॅलटेक) पीएचडी पूर्ण केली.

तिथे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड फेनमन यांच्यासोबत त्यांनी संशोधन केले. १९७८ मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) दाखल झाले. तेव्हापासून निवृत्तीपर्यंत त्यांनी टीआयएफआरमधून सांख्यिकी भौतिकशास्त्रात अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे संशोधन केले, या क्षेत्राला पुढे घेऊन जाईल अशी विद्यार्थ्यांची पिढीही घडविली.

निवृत्तीनंतर ते 'टीआयएफआर'सोबत आयसर मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मितभाषी, निगर्वी, साधे राहणीमान आणि विद्यार्थीप्रिय असे प्रा. धर यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

पद्मभूषण पुरस्कार घोषित झाल्याने मला आनंद झाला आहे. माझ्या संशोधनाची दखल घेतली असून, या पुरस्काराला पात्र ठरू एवढं कार्य करण्याचा प्रयत्न करेल.

- डॉ. दीपक धर, ज्येष्ठ संख्याकी भौतिकशास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com