स्वातंत्र्यदिनी निगडीतील राष्ट्रध्वज फडकता ठेवण्यासाठी निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पिंपरी - निगडी येथे महापालिकेने उभारलेला देशातील सर्वाधिक उंचीचा (107 मीटर) राष्ट्रध्वज कायमस्वरूपी फडकता ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. हा राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनी व दररोज फडकता ठेवण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक अमित गावडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

'राष्ट्रध्वज फडकण्याची प्रतीक्षा' अशा आशयाचे वृत्त गुरुवारी (ता.2) दै.सकाळमध्ये प्रसिद्ध झाले. तर, बुधवारी त्याबाबतचा व्हिडिओ आणि बातमी ई-सकाळला प्रसिद्ध झाली. त्या पार्श्‍वभूमीवर, नगरसेवक गावडे यांनी महापालिका प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने निगडी येथे उभारलेल्या राष्ट्रध्वजामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली. त्यानंतर, मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात आला. गेल्या सात महिन्यांत तब्बल दहा ते बारा वेळा या राष्ट्रध्वजाचे कापड फाटले होते. वाऱ्याचा वेग आणि 80 किलो वजनामुळे हा ध्वज वारंवार काढण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ध्वज फडकता ठेवण्यात अडचणी येत आहेत. मात्र, याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढणे आवश्‍यक आहे.

Web Title: A request to keep the flag of freedom in the freedom struggle