माणिकडोह धरणाच्या पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 11 मे 2018

जुन्नर - यावर्षी चांगला पाऊस होऊन देखील माणिकडोह धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लाहत आहे. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे  नियोजन झाले नाही आणि त्यामुळे मे अखेर टंचाईला सामोरे जाण्याची पाळी आली. शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून गेली. या वर्षी देखील चांगला पाऊस पडून सुद्धा नियोजनाअभावी दुष्काळजन्य परस्थितीचा सामना धरणाखालील खामगाव, माणिकडोह, पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, गोळेगाव, अलदरे येथील स्थानिक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. 

धरणातून पाणी सोडले तर डायरेक्ट महिनाभर आवर्तन सुरू राहते. पाणी बंद केल्यावर सगळच बंद करतात. पाणी बंद झाल की, धरणाखालील गावांमधील ज्यांच्या नदी वर मोटारी आहे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर्षी उन्हाळा तीव्र स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांची उसाची पिके पाण्याअभावी वाळुन जात आहे. अशा तक्रार आणि ओरड शेतकरीवर्गाची आहे.

आमच्या जमीनी जाऊन आम्हालाच पाणी नाही हां कुठला न्याय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाणी खाली गेल्याने पश्चिम आदिवासी भागातील गावांना पाणी टंचाई भेडसावत आहे. मागील वर्षी तालुक्याचे आमदार शरद सोनवने यांनी येउन पाहणी केली होती. तसेच बंधारा टाकण्याचा शब्द दिला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावर्षी देखील परिस्थिती जैसे थे  आहे. अधिकाऱ्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

माणिकडोह धरणाचे पाणी रोज थोडे थोडे का होईना आम्हाला पण मिळावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावाअशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

Web Title: Requirement for Manikdoh dam water management