
- कोरोना काळात जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर.
- जैविक कचरा गोळा आणि वहन करताना वातावरणात सुक्ष्मजीवांच्या प्रसाराची शक्यता.
- जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारी संयंत्रे महाग आणि खर्चिक.
पुणे : जैविक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी पुण्यातील संशोधकांनी एक संयंत्र विकसित केले आहे. कचऱ्यातील सुक्ष्मजीव आणि कार्बनचे विलगीकरण करणारे हे यंत्र भारती अभिमत विद्यापीठाच्या यशवंत मोहिते महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.
जैविक कचरा जाळताना वातावरणात सूक्ष्मजीवांचा प्रसार होतो आणि कार्बनचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होते. हे टाळण्यासाठी महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बी. बी. बल्लाळ यांच्या नेतृत्वात सतीश पाटील, शरीफ मुजावर, बबनराव पवार, पंकज धर्मे यांनी या संयंत्राची निर्मिती केली. यासंबंधीचे आंतरराष्ट्रीय स्वामित्व हक्कही त्यांनी मिळविले आहे. विकसित करण्यात आलेल्या संयंत्राच्या शिफा शेख, कृष्णा गलवे, तुकाराम घेवारे, प्राची खरे या विद्यार्थ्यांनी चाचण्या घेतल्या.
- सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर
संयंत्राचे महत्त्व ः
- कोरोना काळात जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर.
- जैविक कचरा गोळा आणि वहन करताना वातावरणात सुक्ष्मजीवांच्या प्रसाराची शक्यता.
- जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारी संयंत्रे महाग आणि खर्चिक.
फायदे ः
- जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कमी खर्चाचा पर्याय.
- प्रत्येक रुग्णालयामध्ये संयंत्र बसविणे शक्य.
- तुलनेने कार्बनचे उत्सर्जन कमी.
- मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला