पुणे : पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

Reservation for Panchayat Committee in pune declared
Reservation for Panchayat Committee in pune declared

पुणे : पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी  भोर, वेल्हे आणि मुळशीचे सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. उर्वरित दहापैकी शिरूर, मावळ, हवेली, दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर ही सात पदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. त्यामुळे या पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची आगामी अडीच वर्षासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता.१३) सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.                    

 पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण
पुढीलप्रमाणे : जुन्नर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), आंबेगाव- अनुसूचित जमाती (एस.टी.), शिरूर- सर्वसाधारण महिला, खेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), मावळ- सर्वसाधारण महिला, मुळशी- सर्वसाधारण (खुले), हवेली- अनुसूचित जाती महिला (एस. सी. महिला), दौंड- सर्वसाधारण महिला, वेल्हे- खुले (ओपन), पुरंदर- सर्वसाधारण महिला, भोर- खुले (ओपन), बारामती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि इंदापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com