...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे : "गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता काढली, तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी होईल'' .असे प्रतिपादन केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. 

दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब्स डिस्ट्रिक्‍ट 3234 डी 2, लायन्स इनोव्हेशन फोरम, आकुर्डी येथील सूर्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "देणे लायनीझमचे-लेणे व्याख्यानमालेचे' या लायन्स व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात डॉ. जाधव "भारतीय अर्थव्यवस्था : आजची व उद्याची' यावर बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाले. 

यावेळी अक्षरधाम स्वामिनारायण मंदिर ट्रस्टचे स्वामी ज्ञानवत्सल, लायन्स क्‍लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, व्याख्यानमालेचे संयोजक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserve Bank Governor will be named : Dr. Narendra Jadhav