Pune : रिझर्व्ह बँकेचे नियम पाळून कामकाज करा- अजित पवार

असंख्य ठेवीदारांच्या हिताचा विचार करुनच रिझर्व्ह बँकेने विविध नियम अधिक कडक केलेले आहेत
ajit pawar
ajit pawarsakal

बारामती : असंख्य ठेवीदारांच्या हिताचा विचार करुनच रिझर्व्ह बँकेने विविध नियम अधिक कडक केलेले आहेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन पारदर्शकता ठेवत प्रभावी वसूली करुन बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने कामकाज करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. बारामती सहकारी बँकेची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सभेत पवार बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, रिझर्व्ह बँकेकडून येणा-या मेल्सची दैनंदिन नोंद घेत त्याची पूर्तता व्यवस्थित करा, अगदी पवारांच्या घरातील वसूलीची प्रकरण असेल तरीही त्यांच्यावरही वसूलीची कारवाई करा, आगामी काळात शंभर कोटी रुपयांच्या वसूलीचे घेतलेले उद्दीष्ट संचालक मंडळाने पूर्ण करावे, प्रसंगी महत्वाच्या पदांवर अधिकचा पगार देत चांगले अधिकारी नेमा.

कर्ज देताना या पुढील काळात विचार करुन द्यायला हवे, मृत्युमुखी पडलेल्या कर्जदारांचे वारस भेटतात, पण त्यांचे कर्ज माफ करता येणे शक्य नाही, कायद्यानुसार वारसांना कर्ज भरावेच लागते. मी देखील माझ्या वडीलांनी घेतलेले सोसायटीचे कर्ज त्यांच्यानंतर फेडले होते, असे अजित पवार यांनी सांगितले.

बँकेने आर्थिक शिस्त लावून वसूली प्रभावीपणे करत रिझर्व्ह बँकेसह इतरही नियमांचे तंतोतंत पालन तुम्हाला आवडो अथवा न आवडो करायलाच हवे, अशी तंबीच अजित पवार यांनी संचालक मंडळाला दिली.बँकेने आपल्या शेअरची रक्कम आता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत कर्मचारी व अधिका-यांना सातत्याने प्रशिक्षण द्यायला हवे, याचीही गरज त्यांनी अधोरेखीत केली.

प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत माहिती दिली. कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. या प्रसंगी अँड. करीम बागवान, ज्ञानेश्वर बुरुंगले, तैनूर शेख, सुरेंद्र जेवरे, सूर्यकांत गादीया, शेखर कोठारी, रोहन देवकाते या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट- अशी आहे बँकेची सद्यस्थिती....

• ठेवी 2384 कोटी

• कर्जे 1424 कोटी

• सभासद संख्या 18839

• गुंतवणूक 1003 कोटी

• शाखांची संख्या 36

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com