पंचवीस टक्के राखीव जागांचे प्रवेश रखडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा असतानाही, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याकडे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काणाडोळा केला आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणारी प्रक्रिया जानेवारी महिना निम्मा संपत आला, तरी सुरू झालेली नाही.

राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया गेल्या वर्षी उशिरा सुरू झाली. त्यामुळे अनेक बालकांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केली. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यास सुरवात झाली नाही. प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी, ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे माध्यमांना सांगितले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे विचारल्यानंतर नांदेडे यांनी सरकारकडे बोट केले.

प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीचा शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही; परंतु उपसचिव स्तरावर बोलणे झाले आहे. त्यानुसार शासन निर्णय एक-दोन दिवसांत जारी होईल. त्यानंतर तत्काळ राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रक्रियेची अन्य तयारी झालेली आहे.
- गोविंद नांदेडे, संचालक, प्राथमिक शिक्षण

Web Title: reserve seats admission stop