रेश्‍मा भोसले यांची याचिका; सोमवारी निकालाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी, म्हणून रेश्‍मा भोसले यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील युक्तिवाद शुक्रवारी झाला. याचिकेवरील निकाल सोमवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका रेश्‍मा भोसले यांनी पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी येथून (प्रभाग क्र. 7) महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी) फॉर्म भरला होता. या प्रभागातील कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी 

त्याला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने भोसले यांना अपक्ष उमेदवार ठरविले होते. त्यामुळे भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिच्यावरील सुनावणी शुक्रवारी झाली; परंतु रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झाला नव्हता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोसले यांना अपक्ष उमेदवार ठरवून इस्त्री हे निवडणूक चिन्ह दिले आहे. 

Web Title: Reshma Bhosale's petition