माजी विद्यार्थ्यांनी केलेला शिक्षकांचा सन्मान आजच्या पिढीतील मुलांना प्रेरणादायी ठरेल - उपमुख्यमंत्री पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर

माजी विद्यार्थ्यांनी केलेला शिक्षकांचा सन्मान प्रेरणादायी ठरेल - उपमुख्यमंत्री पवार

मुंढवा : आपण शाळेत शिकत असतांना, शाळेतील आठवणी आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. त्या आठवणी आपलेपणाच्या वाटत असतात. त्या आपण कधीच विसरू शकत नाही. आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचा आदर करून यथोचित सन्मान केला ते तुमच्यातील चांगुल पणाचे लक्षण आहे. ते आजच्या पिढीतील मुलांना प्रेरणादायी ठरेल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या सन १९८८ या वर्षांतील १० वीत शिकणारे, शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी ३५ वर्षांनी या शाळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते त्या वेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक बंडू गायकवाड, शाळेचे प्रा. शिवाजी म्हेत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व माजी व आजी प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यास उपमुख्यमंत्री पवार उपस्थित राहिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा आनंद व्दिगुणीत झाला.स्नेह मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.

'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या वेळी उपमुख्यमंत्री पवार व सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. या वेळी प्रा. शिवाजी म्हेत्रे, माजी प्रा. भगवान गोफणे, पंढरीनाथ घायतडक, अशोक डुंबरे मोहन भोसले यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनीही त्या वेळेच्या आपल्या आठवणी सांगितल्या. सुत्रसंचालन सुहास भंडारी यांनी तर अभार सुहास जाधव यांनी मानले. शाळेच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांनी आर्थिक देणगीचा चेक उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते प्राचार्यांकडे सुपुर्द केला.

Web Title: Respect Teachers Alumni Inspire Today Generation Children Pune District Board Of Educations Lonakar Secondary School At Mundhwa Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top