आपत्तीच्या परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद द्यावा - डॉ. राजेश देशमुख

पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपत्ती अचानकपणे येत असल्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी.
Rajesh-Deshmukh
Rajesh-DeshmukhSakal
Summary

पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपत्ती अचानकपणे येत असल्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी.

पुणे - पर्यावरणात (Environment) होत असलेल्या बदलांमुळे (Changes) नैसर्गिक आपत्तीचे (Natural Disasters) प्रमाण वाढले (Increase) आहे. आपत्ती अचानकपणे येत असल्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी (Preparation) करावी. आपत्तीच्या परिस्थितीत मनुष्यहानी टाळण्यासाठी सूचनांचा वेगवान प्रसार होणे महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित विभागांनी तत्काळ प्रतिसादावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे या वेळी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी या विकासकामांची पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी उपाययोजना करावी. पालखी मार्गावरील उताराच्या ठिकाणी आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. पावसाळी पर्यटनस्थळावर गर्दी लक्षात घेता पूर्व खबरदारी घ्यावी. आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील औषधे तयार ठेवावीत.

दिवसे म्हणाले, शहरात कमी वेळात होणाऱ्या मोठ्या पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. नदीपात्रातील अतिक्रमण दूर करण्यात यावीत. आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही, याचे नियोजन आधी करावे. नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी पीएमआरडीए संपूर्ण सहकार्य करेल. आपत्तीच्या काळात परिवहन महामंडळाने रात्री धोकादायक भागात बस सुरू ठेवू नयेत. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, कृषी, ‘एनडीआरएफ’, ‘बीएसएनएल’ आदी विभागांनी पूर्वतयारीची माहिती दिली.

जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य केंद्रात पुरेशा औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ९५ प्रकल्पांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ येथील नाला खोलीकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

देशात यावर्षी सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस होइल, असा अंदाज आहे. हवामान विभागातर्फे सातत्याने हवामानाचा अंदाज दिला जाणार आहे.

- के. एम. होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान विभाग पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com