हडपसर येथे श्रवणयंत्रे वाटप शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

दोन दिवसीय मोफत श्रवणयंत्रे वाटप शिबीरात 163 लाभार्थींची आॅडिओमेट्री करून त्यांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. हे शिबीर महमदवाडी आणि उरूळीकांचन येथे घेण्यात आले.

हडपसर - मुकबधिर मुलांच्या कानावर जर शब्द पडले नाहीत तर ते बोलू शकत नाहीत. त्यांना ऐकायला येत नसल्याने बोलता येत नाही. अत्याधुनिक श्रवणयंत्रामुळे मुलांची एेकण्याची स्थिती सुधारते व सरावाने लाभार्थी बोलू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सानेगुरुजी आरोग्य केंद्राक मोफत श्रवणयंत्रे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत अलि यावर जंग इन्स्टिट्युट आॅफ स्पिच अॅण्ड हिअरींग, मुंबईचे विस्तार अधिकारी अरूण बनिक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, अविनाश सुखाडे, बालाजी शिंदे, संजय खंडागळे, गोपाळ शर्मा उपस्थित होते. 

दोन दिवसीय मोफत श्रवणयंत्रे वाटप शिबीरात 163 लाभार्थींची आॅडिओमेट्री करून त्यांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. हे शिबीर महमदवाडी आणि उरूळीकांचन येथे घेण्यात आले. या शिबीराचे आयोजन अलि यावर जंग इन्स्टिट्युट आॅफ स्पिच अॅण्ड हिअरींग, मुंबई, ससुन रूग्णालय, औंध चेस्ट हॅास्पीटल, रोटरी क्लब आॅफ पुणे डाउनटाउन व महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले होते. अनिल गुजर म्हणाले, श्रवणयंत्र बसविल्यानंतर मुलांसोबत कमीत कमी एक तास त्यांच्यासमोर बसून बोलावयास पाहिजे. त्यांच्याकडून शब्द बोलून घेतले पाहिजे. हळूहळू छोटी वाक्ये त्यांना बोलावयाला शिकविली पाहिजेत. श्रवण यंत्र रोज वापरल्यामुळे त्यांना रोज वेगवेगळे नवीन शब्द एेकायला येतील व त्यांच्या शब्द संग्रहात भर पडून सरावाने ते बोलू शकतील. 

भास्कर विश्वनाथ सराफ म्हणाले, माझे वय 79 आहे. या शिबीरात चांगल्या प्रकारची कानाची तपासणी करून मला श्रवणयंत्रे देण्यात आले. सर्व डॅाक्टरांनी योग्य मार्गदर्शन केले व मोफत श्रवणयंत्रे दिली. त्यामुळे आता मला चांगल्याप्रकारे ऐकू येते. ओम साठे म्हणाला, श्रवण यंत्र बसविल्यामुळे मला चांगले एेकायला येवू लागले आहे. त्यामुळे आता मला नीट एेकू आल्याने बोलायलाही खूप मदत होईल. तसेच वर्गात देखील मला एेकू येईल व माझ्या अभ्यासात प्रगती होईल. पालक विनायक शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य मंडळाने चांगला उपक्रम राबविला आहे. श्रवणयंत्रामुळे अवधुतचा आता चांगला फायदा होणार आहे. आता त्याचे शिक्षण, अभ्यास चांगला होईल व त्या एेकू आल्याने त्याच्याशी संवाद साधायला चांगली मदत होणार आहे.

 

Web Title: response to the hearing aids program at Hadapsar