मनसेच्या "खळखट्याक'ला प्रतिसाद 

nilesh1.JPG
nilesh1.JPG

पुणे ः  येत्या सात दिवसांमध्ये सिंहगड रस्त्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल व 31 मार्च 2021 पूर्वी संपूर्ण काम पूर्ण झालेले असेल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे सुरू केले रस्ता रोको आंदोलन स्थगित केले. 

सकाळी साडेदहाच्या दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी किरकटवाडी फाट्याजवळ आंदोलनाला सुरवात केली. तीव्र घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला होता. या वेळी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी व सरकार विरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते, विधी विभाग जिल्हाध्यक्ष ऍड. अरविंद मते, हवेली तालुका उपाध्यक्ष कालिदास चावट, सुनील कोरपडे, वीरेंद्र सैंदाणे यांच्यासह स्थानिक नागरिक आंदोलनासाठी उपस्थित होते. 

आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास "मनसे स्टाइल'ने खळखट्याक आंदोलन केले जाईल. - महादेव मते, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मनसे 
- - - - - - - - - - 
आठवडाभरामध्ये रस्त्याच्या कामाला पूर्ण क्षमतेने सुरवात होईल. यापुढे ठेकेदाराने कामास जाणीवपूर्वक विलंब केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. - वैशाली भुजबळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 
-------------------------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com