विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही - प्राध्यापक पंकज गावडे

मिलिंद संधान
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नवी सांगवी (पुणे) - " चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांबरोबर पालकांचीही आहे. " असे प्रतिपादन प्राध्यापक पंकज गावडे यांनी चाकण येथे केले.

नवी सांगवी (पुणे) - " चारित्र्यवान साने गुरूजींचे जीवन हे त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांची वात्सल्यसिंधु आईच्या संस्कारामुळे घडले, त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांबरोबर पालकांचीही आहे. " असे प्रतिपादन प्राध्यापक पंकज गावडे यांनी चाकण येथे केले.

पुण्याचे माजी महापौर गुरूवर्य बाबुराव जगताप यांच्या 130 व्या जयंती निमित्त दापोडी येथील जनता शिक्षण संस्थ्येच्या वतीने मिरा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सचिव सुभाष गारगोटे, कार्याध्यक्ष यादव कांबळे, खजिनदार पोपटराव देवकर, सहसचिव पंडित मोरे यांच्यासह गव्हर्निंग काँन्सिलचे सभासद उपस्थित होते. 

गुरूवर्य बाबुराव जगताप यांचा जन्मदिवस संस्थेचा वर्धापन दिन म्हणूनही साजरा केला जातो. यावेळी संस्थापक कै दादासाहेब जगताप (शिक्षकेतर), माईसाहेब जगताप (शिक्षिका) व गुरूवर्य बा ग जगताप (शिक्षक) यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक अनुक्रमे भिमा बांबळे, शारदा जगदाळे व वसंतराव सुर्यवंशी यांना दिला. यावेळी जनता शिक्षण संस्थेच्या पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, पुरंधर, हवेली, खेड, आंबेगाव येथील शाळेतील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

प्राध्यापक गावडे म्हणाले, " आफ्रीकेतील काही देशांमध्ये शिक्षणावर पंचेचाळीस टक्के बजेत खर्च होत आहे. जी - 8 अशा राष्ट्रांमध्ये शिक्षकांचा सर्वोच्य सन्मान होत असल्याने ती राष्ट्रे प्रगत झाली. परंतु आपल्याकडे शिक्षकांनी जनगणना करायची, शौचालये मोजायची यासारखी कामे करावी लागत असल्याने शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. "

किशोर गोरे यांनी प्रास्ताविक केले, सुत्रसंचलन मुरलीधर मांजरे यांनी केले तर पोपटराव ताकवले यांनी आभार मानले.

Web Title: responsibility of Student's is parents & teachers - Professor Pankaj Gawde