esakal | पुणे शहरात लॉकडाऊन नको, पण...; काय म्हटलंय IISER, TCSच्या अहवालात?

बोलून बातमी शोधा

Corona_Lockdown

या संस्थांनी हा अभ्यास अहवाल बुधवारी (ता.१०) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केला आहे.

पुणे शहरात लॉकडाऊन नको, पण...; काय म्हटलंय IISER, TCSच्या अहवालात?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून दिवसेंदिवस सातत्याने कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागणार की नाही, या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी केलेल्या अभ्यास अहवालात पुणे शहरात लॉकडाऊन नको, पण निर्बंध अधिक कडक करण्याची गरज असल्याची शिफारस केली आहे.

Mahashivratri 2021: शिवभक्तांनो, दर्शनासाठी जाऊच नका; भीमाशंकरमध्ये कर्फ्यू लागू​

या संस्थांनी हा अभ्यास अहवाल बुधवारी (ता.१०) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केला आहे. याबाबत राव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही. मात्र या वृत्तास विभागीय आयुक्त कार्यालय आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येत्या शुक्रवारी (ता.१२) पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पवार हे या अभ्यास अहवालातील शिफारशींच्या आधारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची घोषणा करणार आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचं 'देऊळ बंद'; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय​

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतरची पहिल्या दोन महिन्यांचा (एप्रिल व मे) अपवाद वगळता जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत गेली. त्यामुळे या कालावधीत कडक निर्बंधांसह शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी होत गेल्याने, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांत रुग्ण संख्या खूप कमी झाली होती. यामुळे पुणेकरांनी सुटकेचा श्‍वास सोडला होता. पण फेब्रुवारीच्या अखेरीपासून पुन्हा झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

बातमी महत्त्वाची : उन्हाळा होणार ६ महिन्याचा; वैज्ञानिकांचा गंभीर इशारा​

या अहवालातील प्रमुख शिफारशी?
- शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवावीत.
- गर्दी होणारे कार्यक्रम, सभा, सभारंभ स्थगित करावेत
- लग्नासाठी मोजक्याच व्यक्तींना परवानगी द्यावी
- अंत्यविधीसाठी मर्यादित संख्येची अट असावी.
- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, चित्रपटगृहे, माल बंद करावेत.
- सार्वजनिक वाहतूक बंद करावी
- सरकारी, निम्म सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मर्यादित उपस्थिती असावी.
- शक्य असलेल्या क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरू करावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)