पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे निर्बंध होणार शिथिल

ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) सात टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कडक निर्बंधही शिथिल होण्याचा मार्ग झाला मोकळा.
Coronavirus
CoronavirusSakal

पुणे - पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) आठवडाभरापासून शिथिल (Relax) झाले असले तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (Rural Area) मात्र आजही पूर्वीप्रमाणेच कडक निर्बंध लागू आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा दर हा दहा टक्क्यांहून अधिक असल्याने पूर्वीचे निर्बंध कायम ठेवले गेले होते. (Restrictions on Corona Relaxed in Rural Areas of Pune District)

परंतु आता ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) सात टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कडक निर्बंधही शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा निर्णय उद्या (ता. १८) पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीत होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

Coronavirus
पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

कोरोनाबाधितांचा दर किमान दहा टक्के किंवा त्याहून अधिक असलेल्या भागात कडक निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यानुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर हा १२ टक्केंच्या आसपास होता. त्यामुळे पालकमंत्री पवार यांनी ग्रामीण भागाचा अपवाद वगळता पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती.

राज्य सरकारने ‘अनलॉक’बाबत निश्चित केलेल्या गटानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा गेल्या आठवड्यात चौथ्या गटात होता. त्यामुळे ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय पुढेही कायम ठेवण्यात आला होता. मात्र ग्रामीण भाग हा आता तिसऱ्या गटात आला आहे. त्यामुळे येथील निर्बंध शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण बाधितांचा दर हा ६.७० टक्के इतका झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com