हवेली तालुक्याचा बारावीचा निकाल ९०.५२ टक्के

जनार्दन दांडगे
गुरुवार, 31 मे 2018

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याचा बारावीचा निकाल ९०.५२ टक्के लागला असून त्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेच्या किमान कौशल्य विभागाचा शेकडा निकाल ७९.६७ टक्के इतका लागला आहे.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत हवेली तालुक्याचा सरासरी निकाल ९०.५२ टक्के लागला असून लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, माईर्स विश्वशांती गुरुकुल व फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

तालुक्यातील उच्चमाध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे :- एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (लोणी काळभोर) - १००, माईर्स विश्वशांती गुरुकुल (लोणी काळभोर) - १००, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (फुलगाव) - १००, एशियन ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स (नऱ्हे) - ९७.७२, गायत्री इंजिनिअरिंग स्कूल व ज्युनिअर कॉलेज (मोशी) - ९९.४७, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (खानापूर) ९८.२७, संत तुकाराम ज्युनिअर कॉलेज (देहू) ९७.४१, जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (वाडेबोल्हाई) - ९६.७७, वाघेश्वर इंजिनिअरिंग ज्युनिअर कॉलेज (वाघोली) - ९६.५५, नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (फुलगाव) - ९६.४२, भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (वाघोली) ९६.३६, शिवभूमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स (खेड शिवापूर) - ९५.२१, संत तुकाराम ज्युनिअर कॉलेज (लोहगाव) - ९३.३७, नवभारत उच्चमाध्यमिक विद्यालय (शिवणे) - ९२.६१, श्री नागेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (मोशी) - ८९.१८, विष्णुजी शेकुजी सातव ज्युनिअर कॉलेज (वाघोली) - ८७.५८, कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (मांजरी) - ८६.३६, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (उरुळी कांचन) -८४.५१, श्री. शिवाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (देहूरोड) - ८४.००, शिवशंभो महादेव ज्युनिअर कॉलेज (फुरसुंगी) - ८१.०३, श्री वाघेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (चऱ्होली) - ८०.५९, चिंतामणी ज्युनिअर कॉलेज (थेऊर) - ६९.२३, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल (लोणी काळभोर) - ५९.५३.

त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये किमान कौशल्य शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे :- महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (खानापूर) - ९२.५३, नवभारत उच्चमाध्यमिक विद्यालय (शिवणे) - ८३.०९, श्री नागेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (मोशी) - ८४.२१ , विष्णुजी शेकुजी सातव ज्युनिअर कॉलेज (वाघोली) - ९५.७७, कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (मांजरी) - ७२.२२, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (उरुळी कांचन) - ५४.११, श्री वाघेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (चऱ्होली) - ७५.८०.

Web Title: result of 12th of haveli tehsil is 90.52 percent