बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्नीक कॉलेजचा निकाल ९५ टक्के

राजकुमार थोरात 
शनिवार, 9 जून 2018

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथील फडतरे कॉलेज सिटीअंर्तगतच्या बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक कॉलेजचा अंतीम वर्षाचा निकाल ९५ टक्के लागला आहे. पॉलिटेक्निकचे कॉलेजचे प्राचार्य के.बी.गवळी यांनी ही माहिती दिली. 

महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळातर्फे एप्रिल-मे २०१८ राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये  येथील विद्यालयातील १०९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील १०३ विद्यार्थी पास झाले आहेत. 

येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पाच विभाग असून सिव्हील इंजिनिअरिंग, इलेक्टॅ्ानिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या दोन्ही विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागचा निकाल 95.83 टक्के, अॅटोमोबाइल इंजिनिअरिंगचा निकाल 85.71 टक्के, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा निकाल 96.36 टक्के निकाल लागला आहे. कॉलेजमधील सिव्हील विभागातील शुभम कदम याने 88.13 टक्के, इलेक्टॅ्ानिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन विभागातील वर्षा शिंगाडे हिने 87.85 टक्के, व सिव्हील इंजिनिअरिंगमधील  सागर जाधव याने 87.75 टक्के सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दत्तात्रेय फडतरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन केले. 
 
Web Title: The result of Babasaheb Phadte Polytechnic College is 95 percent