पुण्यातील शाळांचा दहावीचा निकाल 90 टक्‍क्‍यांच्या पुढे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. हरिभाऊ बळवंतराव गिरमे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 93 टक्के लागला आहे. गीता घुगेने 93 टक्के मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला, तर वैभवी सूर्यवंशी (89.20 टक्के) आणि हर्ष जोशी (88.80 टक्के) गुण मिळवीत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे. 

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालयाचा (मुलींची) दहावीचा निकाल 96.56 टक्के लागला आहे. सिद्धी शेठ या विद्यार्थिनीने 97.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकाविला, तर पूर्वा भट, शिवानी थोरवे (97 टक्के) आणि आकांक्षा माने (95.80 टक्के) यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. 

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. हरिभाऊ बळवंतराव गिरमे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 93 टक्के लागला आहे. गीता घुगेने 93 टक्के मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला, तर वैभवी सूर्यवंशी (89.20 टक्के) आणि हर्ष जोशी (88.80 टक्के) गुण मिळवीत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे. 

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.10 टक्के लागला आहे. सादिया 
युसुफी हिने 91.20 टक्के मिळवीत शाळेत पहिला क्रमांक पटकाविला, तर मोहम्मद अन्सारी याने (89.80 टक्के) द्वितीय आणि हमझा खान याने (89.20 टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. 
 
Web Title: The result of Class 10 in schools in Pune is 90%