निकाल लागला; पण भरपाई मिळेना; काय आहे प्रकरण वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

विनंतीही करता येईना 
निकालाची अंमलबजावणी न केल्यास प्रतिवादीची संपत्ती जप्त करून पैसे मिळण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी तक्रारदार अर्ज करू शकतो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या प्रतिवाद्यांविरोधात वॉरंटदेखील काढता येत नाही, तर जप्तीची प्रक्रिया करण्याच्या अर्जाबाबत प्रतिवाद्याला हजर होऊन म्हणणे मांडता येईलच, असे नाही. त्यामुळे विनंतीच्या प्रक्रियादेखील थांबल्या आहेत. तसेच सध्या मंचात सुनावणीही बंद आहे, असे ॲड. पवनकुमार भन्साळी यांनी सांगितले.

पुणे - सेवा पुरवठादाराने केलेल्या फसवणुकीबाबत ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. मात्र, निकालांची अंमलबजावणी न झाल्याने नुकसानभरपाईसाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फसवणुकीच्या तक्रारीबाबत ग्राहकाने सादर केलेले पुरावे आणि त्यावर सेवा पुरवठादार कंपनी किंवा व्यक्तीचे म्हणणे सादर झाल्यावर मंचाचे अध्यक्ष योग्य तो निकाल देत असतात. फसवणुकीमुळे ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून प्रकरणानुसार रक्कम प्रतिवाद्याने ग्राहकाला द्यायची असते. मंचाने निकाल दिल्यापासून ३० ते ९० दिवसांत त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या लॉकडाउन असल्याने न्यायालयीन तसेच आर्थिक व्यवहारांवर काही निर्बंध आले आहेत.

सलून आणि ब्युटी पार्लरबाबतची 'ती' जनहित याचिका घेतली मागे!

तसेच, ज्यांना ग्राहकाला पैसे देण्याची इच्छा नाही अशा प्रतिवादींना ही आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चअखेरीस झालेल्या अनेक निकालांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. निकाल होऊनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असून, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे वाजवून सुरू होता डान्स, पोलिसांनी अशी काढली वरात

कलम २५ किंवा २७ नुसार अर्ज आल्यानंतर मंचाकडून पुढील कार्यवाही सुरू होते. तक्रारदार त्यांच्या सोयीने ऑनलाइन किंवा प्रत्यक्षात अर्ज करू शकतात. एक जुलैपासून कामकाज सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विनंती किंवा विविध प्रकारच्या अर्जांवर लवकरच प्रत्यक्षात सुनावणी होईल.
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Results were obtained but no compensation was received