हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या 'एम्स' मधील निवृत्त डॉक्टरला अटक

arrested.jpg
arrested.jpg

पुणे : मल्याळम व हिंदी चित्रपटसृष्टितील अभिनेत्रींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या एका डॉक्टराला अटक केली. याप्रकरणातील दोन्ही अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. शुक्रवारी पहाटे बंडगार्डन रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. 

डॉ.सुरेश कुमार सुद (वय 78, रा.मीरा रोड, ठाणे) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुद हा मुंबईतील हिंदी व मल्याळम चित्रपटात काम करणाऱ्या 24 व 25 वर्षीय अभिनेत्रींना पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाची खात्री केली. त्यानंतर सापला रचुन डॉक्टरला अटक केली. तर दोन्ही अभिनेत्रीची सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com