Pune : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून गावाला पाण्याचा टँकर सुरू; पाणी प्रश्न सुटण्यास मदत

दोन हजार लोकवस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
Retired headmaster starts water tanker service for village junnar pune
Retired headmaster starts water tanker service for village junnar punesakal

जुन्नर : पश्चिम आदिवासी भागातील निमगिरी ता.जुन्नर येथे पिण्याच्या पाण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल रढे यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू केल्याने सुमारे दोन हजार लोकवस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

निमगिरी गावठाण तसेच खांडेचीवाडी,रढेवस्ती व राजवाडा येथे टँकर मार्फत दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन रढे यांनी केले आहे. ऐन उन्हाळ्यात सामाजिक जाणिवेतून माझा गाव व वाड्या वस्त्यांसाठी पाण्याचा टँकर सुरू करून ग्रामस्थांना मदतीचा हात दिला आहे त्यांच्या ह्या निःस्वार्थ उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे,खामगाव-तांबे गटाच्या महिला अध्यक्ष सरपंच कमलताई शेळकंदे,सरपंच सुशिला ढेंगळे,उपसरपंच अजिंक्य घोलप,खामगाव-तांबे गटाचे युवक अध्यक्ष संदिप मुंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

निमगिरी गावासाठी जलजीवन योजनेच्या नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे.ती पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या गावातील विधान विहिरी तसेच विहिरीतील पाण्याचे स्रोत आटले असून अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गाव व वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवत असल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात आदिवासी भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. सरकारकडे टँकरचा प्रस्ताव सादर केल्यानंतर काही दिवसांनी टँकर सुरू होतात परंतु आज माझ्या लोकांवर वेळ आहे आणि त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे ह्या भावनेतून शासकीय टँकर सुरू होई पर्यत पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे रढे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com