Pune Rain : परतीचा पावसाचं नवं रेकॉर्ड; ऑक्‍टोबरचे आकडे बोलतात...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली.

पुणे : या वर्षीच्या पावसाने ऑक्‍टोबरमध्ये पुणेकरांना अक्षरश: झोडपून काढले. अनेक नागरिकांच्या संसारावर पाणी फेरले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये शहरात पडलेला पाऊस हा सर्वाधिक आहे. 

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मॉन्सूनपाठोपाठ परतीच्या मॉन्सूननेदेखील राज्याला झोडपून काढले. या महिन्यात 235 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद पुण्यात झाली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्पष्ट होते. 

या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात 2015 ते 2019 या वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्‍टोबर 2015 मध्ये पुण्यात 7 दिवसांत 76.7. मिमी, 2016 मध्ये 7 दिवसांत 80.4 मिमी, ऑक्‍टोबर 2017 मध्ये 11 दिवसांत 180.1 मिमी, तर ऑक्‍टोबर 2018 मध्ये 7 दिवसांत 36.1 मिमी इतका पाऊस झाला. मात्र, ऑक्‍टोबर 2019 च्या पावासाने या वर्षातील उच्चांकी आकडा गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

चक्रीवादळाचा परिणाम 

दरम्यान, पावसाचा परतीचा दौरा अद्याप कायम असून, 'क्‍यार' आणि 'माहा' या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळांचा थेट परिणाम परतीच्या पावसावर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे. 

पाऊस मिलिमीटरमध्ये 

वर्ष 2015 2016 2017 2018 2019
ऑक्‍टोबर 76.7 80.4 180.1 36.1 235 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Return rainfall makes new record of October month