भिगवण - चोवीस वर्षांनी भेटले शाळकरी संवगडी

प्रशांत चवरे 
सोमवार, 7 मे 2018

भिगवण : येथील भैरवनाथ विद्यालयाच्या एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने चोवीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. 1994 मधील येथील भैरवनाथ विदयालयांतील माजी विदयार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. 

येथील भैरवनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी हर्षद रायसोनी, रामचंद्र कदम, संदीप ताटे, अतुल लंबाते, सतीश शिंगाडे, विश्वास देवकाते, विष्णुपंत देवकाते यांचे विशेष प्रयत्नातुन 1994 च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्याच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक शिक्षक अनंता मराडे, रामचंद्र बचुटे, विलास जामले तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक बंदिष्टी व पर्यवेक्षक दत्तात्रय पांढरे उपस्थित होते.

1994 मधील इयत्ता दहावीच्या बॅचचे  65 विद्यार्थी आजही शिक्षकाकडुन आयुष्याचे धडे घेण्यासाठी वर्गात उपस्थित होते. पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी नाना बंडगर, राजेंद्र गायकवाड, मनिषा सुकाळे, जनीन मतीशे, शितल जाधव, श्रीराम नहाणे या माजी विदयार्थ्यांनी तत्कालीन गमती जमती, सुख, दुःख, झालेल्या चुका, मिळालेले यश, मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कायर्क्रमामध्ये रंगत आणली. वर्गामध्ये ज्ञानाचे धडे देणाऱे तत्कालीन शिक्षक रामचंद्र बचुटे, विलास जामले, अनंता मराडे यांनी मेळाव्यामध्ये मुलांना समाजामध्ये कसे वागावे याचे धडे दिले.             

प्रास्ताविक तुकाराम बंडगर यांनी केले. सुत्रसंचालन गणेश राक्षे यांनी केले तर आभार जयदीप जाधव यांनी मानले. चोवीस वषार्नी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक, मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपकार्त राहण्याचा संकल्प केला. गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे मनोदय विदयार्थांनी व्यक्त केला.

Web Title: reunion after 24 years in bhigwan