जुन्नरला महसूल विभागाकडून अपंगांचा सन्मान

दत्ता म्हसकर
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जुन्नर - जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आज सोमवार ता.03 रोजी जुन्नर महसूल विभागाच्या वतीने अपंग दिन साजरा करण्यात आला. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये अपंग घटकांना सहभागी करून घेऊन सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे निवडणूक नायब तहसिलदार रवींद्र वळवी यांनी सांगितले. 

यावेळी जुन्नरच्या मंडलाधिकारी शोभा भालेकर, तलाठी अशोक गायकवाड, संजय अहिरे, अपंग संघटनेच्या अध्यक्षा पुष्पा गोसावी, सचिव शरद शिंदे, खजिनदार निवृत्ती कामटकर, कार्याध्यक्ष प्रताप मालेगावकर, किरण टंन्नू, सुनील जंगम यांसह अपंग बांधव उपस्थित होते. त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

महसूल विभागाच्या संजय गांधी, आम आदमी विमा योजना यांसह विविध योजना अपंगांसाठी परिणामकारक पणे राबविणे तसेच विविध सामाजिक संस्थानी अपंगाच्या कल्याणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी मंडलाधिकारी शोभा भालेकर यांनी केले. अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Revenue Department honors Disables