आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे.

पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे. 

दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे. 

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' 

दिवाळीच्या काळातील वाहन विक्री 
वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019 
दुचाकी ------------------8685-------------9478----------5337 
चार चाकी ----------------1145--------------3471---------2080 
व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303 
आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department