तलाठ्यांच्या रिक्त जागांमुळे महसुली कामांची कोंडी

Talathi
Talathi

पिंपरी - महसूल विभागाचा कारभार अनेक महिन्यांपासून अत्यल्प कर्मचाऱ्यांवरच सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील तलाठ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे नागरिकांच्या कामांसह प्रशासनाच्या कामांवरही परिणाम होत आहे.

वर्षभर नागरिकांना विविध दाखल्यांसाठी तलाठ्यांची गरज भासत असते. तसेच सातबारा उतारे, जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहाराच्या नोंदी, फेरफार व इतर दफ्तर हे संगणकीकृत करण्याचे काम त्यांच्याकडेच असते. पिंपरी वाघेरे सजाचे तलाठी पदांची समस्या कायम आहे. येथील महिला तलाठ्यांची जागा रिक्त झाल्याने अद्याप त्या जागी नियुक्ती केली नसल्याने रहाटणी सजाचे तलाठी स्वप्नील पटांगे हे अतिरिक्त कारभार पाहत आहेत. तर आकुर्डी सजाच्या तलाठी शांता बाणखेले यांच्या खांद्यावर निगडी सजाची अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यांना निगडी, किन्हई व चिंचोली गावांचा कारभार पाहावा लागत आहे.

किवळे सजाचे कामकाज तलाठी अतुल गिते पाहतात. त्यांच्याकडे देहू सजाचे जादा काम दिल्याने देहूगाव, माळीनगर व विठ्ठलनगरचे अतिरिक्त काम त्यांना पाहावे लागते. दिघी व बोपखेल सजाचे कामकाज प्रस्तावित असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. रिक्त जागांमुळे महसूल वसुलीचेही काम थंडावले असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com