जुन्नरला मंगळवारपासून मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम

दत्ता म्हसकर
सोमवार, 14 मे 2018

भावी मतदारांची नावे गोळा करणे, दुबार, मयत कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किरण काकडे यांनी सांगितले.

जुन्नर : राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जुन्नर तालुक्यात मंगळवार ता.१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.अशी माहिती तहसिलदार किरण काकडे यांनी दिली. 

या कार्यक्रमानुसार १५ मे ते २० जून २०१८ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरोघरी भेट देऊन पडताळणी करतील. २१ जून ते ३१ जुलै  मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, १ ते ३१ ऑगस्ट प्रारुप मतदार यादी तयार करणे , १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे,  १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत मतदार यादी बाबत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 
या कार्यक्रमात मतदार यादी मधील तफावतीचा शोध घेणे, मयत, दुबार स्थलांतरित मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करणे, यादी भाग व नकाशे निश्चित करणे, शंभर टक्के मतदान केंद्रांची पडताळणी करणे तसेच प्रत्येक बीएलओनी मतदारांची पडताळणी करायची असून त्यांची माहिती गोळा करायची आहे.  

त्यात दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी पात्र असलेले परंतु अद्याप नोंदणी न झालेले दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी मतदार म्हणून नोंदणी साठी पात्र ठरणाऱ्या भावी मतदारांची नावे गोळा करणे, दुबार, मयत कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किरण काकडे यांनी सांगितले.

Web Title: revised voting list in Junnar