रिक्षावाला झाला दौंडचा उपनगराध्यक्ष

‘राजकारणात ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनाच पद मिळते, असा समज आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य रिक्षावाल्यास उपनगराध्यक्ष करून हा समज खोटा ठरविला.
Sanjay Chitare
Sanjay ChitareSakal

दौंड - ‘राजकारणात ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनाच पद मिळते, असा समज आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य रिक्षावाल्यास उपनगराध्यक्ष करून हा समज खोटा ठरविला,’’ असे मत दौंड नगरपालिकेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संजय चितारे यांनी व्यक्त केले आहे. नगरसेवक म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्णत्वास आला असला, तरी पदाची हवा डोक्यात न गेल्याने त्यांनी पाच वर्षात रिक्षा चालविणे बंद केलेले नाही, हे विशेष.

दौंड नगरपालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेले संजय चितारे यांची नुकतीच उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नगरपालिकेतील काही समित्यांवर काम केल्यानंतर पक्षाने त्यांची शेवटच्या वर्षात या पदावर काम करण्याची संधी दिली. पुढे निवडणुका असल्याने त्यांचा कालावधी कमी आहे, पण पदाचे महत्व अबाधित आहे. साधी राहणी, कमी बोलणं, पण मदतीसाठी तत्पर असणारे चितारे हे दौंड रेल्वे स्थानक परिसर, रिक्षा स्टॅण्ड, सिद्धार्थनगर, नगरपालिका, नवीन कॅार्ड लाइन रेल्वे स्थानक परिसरात सहजरित्या भेटतात.संजय चितारे यांचे वडील रेल्वे खात्यातून मिस्त्री म्हणून सेवानिवृत्त झाले. बारावी उत्तीर्ण चितारे हे मागील २२ वर्षांपासून दौंड शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

Sanjay Chitare
पुणे : महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

छत्रपती शाहू महाराज रिक्षा स्टॅण्डचे ते सदस्य असून, त्यांचे धाकटे बंधू देखील रिक्षाचालक आहेत. त्यांची मुलगी बारावी उत्तीर्ण असून, तिला डॅाक्टर व्हायचे आहे; तर मुलगा अकरावीत असून, त्यास सिव्हिल इंजिनियर व्हायचे आहे. मुलांना चांगले व उच्च शिक्षण देण्याची त्यांची मनीषा आहे. उपनगराध्यक्षपदासाठी अनेक सदस्य इच्छुक असताना संजय चितारे यांची बिनविरोध वर्णी लावण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात यांनी पुढाकार घेतला.

रिक्षामुळे माझी ओळख निर्माण झाली. जे काही दिले ते रिक्षाने दिले आणि भरपूर दिले. दिवसरात्र कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करणारा रिक्षावाला एक कष्टकरी घटक आहे. रात्री-अपरात्री मदतीला धावून येणारा रिक्षावाला आहे. रिक्षावाला वाईट नसतो, एखाददुसरा वाईट असल्याने सगळेच तसे नसतात, असे संजय चितारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com