‘सर्व रिक्षाचालकांना दोषी ठरवू नये’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - सगळेच रिक्षाचालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत. प्रत्येक रिक्षाचालक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावताना दिसेल. वीस रुपयांच्या भाड्यासाठी खून करणाऱ्या रिक्षाचालकांना शिक्षा झालीच पाहिजे. पण या घटनेमुळे सर्वच्या सर्वच रिक्षाचालकांना दोषी ठरवू नये, अशी अपेक्षा शहर जिल्हा काँग्रेस समितीचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली आहे.

वीस रुपयांच्या भाड्यासाठी रिक्षाचालकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. त्यात त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. याच पार्श्‍वभूमीवर काँग्रेस भवन येथे रिक्षाचालक आणि टेंपो मेन्स युनियनच्या (इंटक) प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. 

सर्वच रिक्षाचालक गुन्हेगार नाहीत. रिक्षाचालक दिवसभर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. ते पुणेकरांना प्रामाणिक सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला गुन्हेगार ठरविणे चुकीचे आहे. मात्र जे गुन्हेगार आहेत, त्यांना जरूर शिक्षा करावी, असे बागवे यांनी सांगितले. 

पुणे शहरात ५२ हजार रिक्षा चालक-मालक आहेत. सर्वांना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही, असे समितीने निवेदनाद्वारे म्हटले आहे. इंटकचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, ॲड. म. वि. अकोलकर, दिलीप लोळगे, प्रदीप भालेराव, विजय रवळे, संतोष पांगारकर, बापू धुमाळ आदी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Web Title: rickshaw driver guilty ramesh bagave