भरधाव रिक्षाने दुभाजकाला दिली धडक, अन् नको तेच झालं

Rikshaw
Rikshaw

पुणे, ता. 14 : भरधाव रिक्षाची रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता रामटेकडी येथील बीआरटी मार्गात घडली.

ब्रेकिंग - कोल्हापूरात आणखी 10  कोरोना रुग्णांचा समावेश....
प्रकाश बाबूराव साबळे (वय ५२, रा. काळूबाईनगर, खराडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद पोतदार यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे हे रविवारी रात्री नऊ वाजता रामटेकडी येथील बीआरटी मार्गातुन भरधाव जात होता.

त्यावेळी त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या दुभाजकाला धडकली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com