रिक्षांची कुंडली मिळणार आता 'क्‍यूआर कोड'वर

Rickshaw
Rickshaw
पुणे - पुण्यातील हजारो रिक्षांमध्ये अधिकृत रिक्षा कोणती, हे ओळखणे अवघड झाले आहे. त्यावर तोडगा म्हणून शहरातील परवानाधारक रिक्षांची सर्व माहिती "क्‍यूआर कोड'वर आणली जाणार आहे. हे "क्‍यूआर कोड' प्रत्येक रिक्षामध्ये लावले जाणार आहेत.

पुण्यात 66 हजार परवानाधारक रिक्षा आहेत. अवैध रिक्षा किती हे कोणीही सांगू शकत नाही; परंतु पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेक अवैध रिक्षा सापडत आहेत, अनेक रिक्षांना बनावट नंबर प्लेट लावून चालविल्या जात आहेत. काहीजण रिक्षांचा वापर गुन्ह्यांमध्ये केला जात असल्याने प्रवाशांच्याही सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेकदा रिक्षाचालक प्रवाशांशी वाद घालणाऱ्या रिक्षाचालकांची माहिती मिळत नाही. त्यामुळे तक्रारी करताना अडचणी येत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी रिक्षांची माहिती "क्‍यूआर कोड'वर उपलब्ध होणार आहे. त्यात रिक्षाचा क्रमांक, चालकाचे नाव यासह इतर माहिती असणार आहे. त्यामुळे चोरीच्या रिक्षांसह अवैध रिक्षांची माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होणार आहे.

रिक्षांना "क्‍यूआर कोड'चे स्टिकर लावण्याच येणार आहेत. त्यासाठी आरटीओकडून काम सुरू आहे. क्‍यूआर कोडमुळे प्रवासी पोलिसांना त्याचा उपायोग होईल.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

रिक्षांना "क्‍यूआर कोड' लावण्यालसाठी अद्याप निर्णय झालेला नाही; परंतु तो अमलात आणण्यासाठी विचार सुरू आहे. यासाठी आरटीओच्या परवानगीची गरज आहे.
- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com