संचारबंदीत 1829 नागरिकांना रिक्षासेवा; गर्भवतींना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सर्वाधिक वापर 

autorickshaw
autorickshaw

पुणे - संचारबंदीमुळे नागरिकांची अत्यावश्यक कामासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी सिटीग्लाईड संस्थेसमवेत रिक्षासेवा सुरू केली. दहा दिवसांत 1829 नागरिकांना रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. गर्भवतींना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या सेवेचा सर्वाधिक वापर झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यावश्यक कामासाठी 94 रिक्षा दिल्या असून दहा दिवसांत 14 हजार 443 नागरिकांनी रिक्षासेवेबाबत विचारणा केली होती. ज्या नागरिकांनी योग्य कारण सांगितले. अशा 1829 नागरिकांना रिक्षासेवा उपलब्ध करुन दिली आहे. रिक्षाचे निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. रिक्षातून केवळ एकाच प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रिक्षाचालक आणि प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या व्हॉटसअ‍ॅप मोबाइल क्रमांकावर किंवा ट्विटवर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. 

अत्यावश्यक कामांसाठी रिक्षासेवा आहे. त्यासाठी 14 हजार 443 नागरिकांनी विचारणा केली होती. रिक्षा योग्य कारणासाठी हवी असल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. 
-डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com