बाप रे! पुण्यात विमानापेक्षा रिक्षा प्रवास महाग; चक्क एवढे घेतले भाडे

pune-auto.jpg
pune-auto.jpg

पुणे : पुण्यातून विमानाने प्रवास करायचा म्हणजे एक - दोन हजार रुपये खर्च होतातच, पण आता पुण्यात रिक्षाप्रवास विमानप्रवासापेक्षा जास्त महागला आहे. पुण्यात पहिल्यांदा  आलेल्या एका रिक्षा प्रवासासाठी चक्क 4300 रुपये भाडे आकारल्याचा प्रकार समोर आला. पण हा प्रवासी देखील भलताच अवलिया आहे. या प्रवाशाने 4300 भाडे दिले खरे पण रिक्षाचा रजिस्ट्रेशन नंबर लिहून घेतला आणि येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

बंगळुरवरुन पुण्यात आलेल्या या व्यक्तीला पुण्यातील रिक्षावाल्याने चांगलेच लुबाडले आहे. झाले असे की, बुधवारी सकाळी 5 वाजता बसने कात्रज-देहू रोड बायपास मार्गाने कात्रजला पोहचला. तेथुन कॅब बुक करण्याचा प्रयत्न करुनही कॅब न मिळाल्याने त्याने रिक्षा थांबवली. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत मागे बसला होता तर, त्याचा मित्र रिक्षा चालवत होता. रिक्षाचालकाने मीटरनुसार भाडे घेण्यास मित्राला सांगितले.

मनसेच्या इंजिनला चावी मिळणार; पुण्यात असणार 'हे' उमेदवार

जेव्हा प्रवासी येरवडा पोलिस स्टेशन जवळ राहत असलेल्या ठिकाणी प्रवासी पोहचला तेव्हा मीटरनुसार 4300 भाडे झाल्याचे समजले. त्यावर रिक्षाचालकाने 600 रुपये शहरात यायचे आणि 600 रुपये शहरातून बाहेर जायचे आणि बाकी मुळ भाडे असल्याचे सांगितले. सुनसान रस्त्यावर,अंधार पसरलेला होता आणि त्यात रिक्षाचालकही मद्यधुंद असल्यामुळे वाद न घालाता प्रवाशाने भाडे दिले. मात्र, रिक्षाचा रजिस्ट्रेशन क्रमांक घेवून येरवडा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाविरोधात तक्रार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com