उलगडली मंगळयानाची यशोगाथा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - भिंतीवर रंगांची उधळण करत त्या चित्र रेखाटत होत्या. एका भिंतीवर झाडाच्या पानांमध्ये उमललेली स्वप्ने अन्‌ दुसऱ्या भिंतीवर मंगळयान मोहिमेची यशस्वी गाथा... असं सारं काही शाळेच्या भिंतीवर चित्ररूपाने अवतरलं होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अहिल्यादेवी प्रशाले’च्या विद्यार्थिनींनी केलेली ही किमया. अनेक ज्वलंत विषयांवर भाष्य करून विद्यार्थिनींनी आपल्यात दडलेल्या चित्रकाराला मोकळी वाट करून दिली आहे.

विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रशालेतर्फे ‘बोलक्‍या भिंती’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि विद्यार्थिनींच्या प्रतिसादामुळे काही दिवसांतच शाळेची प्रत्येक भिंत चित्रांच्या दुनियेत रंगून गेली. बोलक्‍या चित्रांमधून अनेक विषय लोकांपर्यंत पोचावेत, त्यासाठीचा हा प्रयत्न. शाळेच्या शून्य तासात विद्यार्थिनींना काहीतरी वेगळे आणि हटके करता यावे, यासाठी सुरू केलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत ५० विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन आपल्या कलेला वाव दिला आहे.

मुख्याध्यापिका सुलभा शिंदे आणि कलाशिक्षक मोहन देशमुख यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकारास आला. विविध प्रयोग, ग्रंथालय, नैतिक मूल्ये, वारली चित्रकला, आकाशदर्शन, शाळेतील विविध उपक्रम, स्वच्छता अभियान, खेळ, व्यायाम, पाणी वाचवा, वीजबचत आणि वृक्षसंवर्धन आदी विषयांवर विद्यार्थिनींनी ऑइल पेंटिंगद्वारे चित्रे रेखाटली आहेत.

भिंती रंगविताना काहीतरी वेगळे करत असल्याचा आनंद झाला. यानिमित्ताने आवडत्या चित्रांना भिंतीवर रंगविण्याची संधी मिळाली. असा उपक्रम राबविणारी आमची पहिलीच शाळा असेल, असे आम्हाला वाटते.
- निकिता गायकवाड आणि वैष्णवी चव्हाण, विद्यार्थिनी

शाळेच्या शून्य तासात विद्यार्थिनींनी काहीतरी वेगळे करावे, असा आमचा प्रयत्न होता. त्यातूनच हा प्रकल्प आकारास आला. सर्जनशीलता, एकाग्रता आणि कलेला वाव मिळाला आणि त्यांच्यातील चित्रकार जागा झाला आहे.
- सुलभा शिंदे, मुख्याध्यापिका

Web Title: Riddle mangal orbiter success stories