घर बचाव संघर्ष समितीत दुही कायम

ज्ञानेश्वर भंडारे
शनिवार, 21 जुलै 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे.

वाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे.

सरकारने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याचा काढलेला जी.आर. फसवा आहे हे जनतेने केलेल्या नियमितीकरणाच्या अर्जावरून लक्षात येते. त्यामुळे जनतेला न परवडनारा दंड आणि जाचक अटी यामुळे जनतेने पूर्णपणे पाठ फिरवली हे सरकारचे अपयश आहे. रिंगरोड चाही प्रश्न आणखी सुटलेला नाही.त्याच्या निर्णयाची नागरिकांना आणखीही प्रतीक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 23 तारखेच्या दौऱ्याच्या अनुषगाने झालेल्या बैठकीत स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीच्या समन्वयकांनी व बाधितांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा निर्णय घेतला. तसेच पिंपरी चिंचवडचे हे प्रश्न जो पर्यंत कायमचे सुटत नाहीत, तो पर्यंत कोणत्याही मंत्र्यांचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मध्ये होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. तर घर बचाव संघर्ष समितीच्या गटाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असे विजय पाटील गटाचे म्हणणे आहे.

रिंगरोडच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून घर बचाव संघर्ष समितीची स्थापना केली होती. पण या संघर्ष समिती मध्येच फूट पडली असून यात आता दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणाच्या पाठीशी जावे हेच समजत नाही.

रिंगरोडबधित नागरिक हे घर बचाव संघर्ष समितीतील समन्वयकाना वारंवार सांगूनही एकत्र लढण्यास तयार होत नाही अशी काही नागरिकांची तक्रार आहे.त्यामुळे नागरिकांना नेमकं काय करायचं हे सुचत नाही नागरिक द्विधा मनस्थितीत असताना समन्वयक मात्र आपली बाजू कशी बरोबर आहे हे सोशल मीडियावरून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिला आहे.आम्ही आमच्या घरांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहोत,त्यामुळे आंदोलनाचा प्रश्नच येत नाही.
- विजय पाटील, घर बचाव संघर्ष समिती

प्रशासनाने आम्हालाही भेटण्यासाठी वेळ दिला आहे,परंतु आम्हांला चर्चा नको तर निर्णय हवा आहे.त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत, प्रशासनाने निर्णायक निर्णय घेऊन आमची घरे वाचवावीत.
- धनाजी येळकर-पाटील, स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समिती

Web Title: rift in committee