शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासासाठी पुणे विद्यापीठातर्फे हक्काची जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरू पंडिता रोहिणी भाटे नृत्य संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
Classical Dance
Classical DanceSakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरू पंडिता रोहिणी भाटे नृत्य संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Pune University) गुरू पंडिता रोहिणी भाटे नृत्य संशोधन प्रकल्प (Dance Research Project) सुरू करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात (University Budget) याविषयीची घोषणा करण्यात आली. भारतीय शास्त्रीय नृत्यविषयक (Classical Dance) मूलभूत संशोधनासाठी या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचे सर्वांगीण आणि सखोल अभ्यास करणारे केंद्र निर्माण होईल, असा विश्वास शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील जाणकारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

महत्त्वाचे निर्णय

  • विद्यापीठाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात या संशोधन प्रकल्पासाठी १० लाख रुपयांची तरतूद

  • परंपरागत भारतीय नृत्ये, त्यांतील सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, प्रशिक्षण पद्धती आणि उपाययोजना यांचा समग्र व बहुआयामी अभ्यास करणे

  • विद्यापीठाच्या ललित कला केंद्राशी संलग्न

संशोधन प्रकल्पाची उद्दिष्टे

  • नृत्याचा इतर कलांच्या दृष्टिकोनातून विचार

  • नृत्यातील परंपरा व प्रशिक्षण पद्धतींचा अभ्यास

  • मूलभूत ज्ञानाचे प्रत्यक्ष कलेतील उपाययोजना

  • शैक्षणिक आणि उपयोजित दृष्टिकोनाच्या एकत्रीकरणातून नावीन्यपूर्ण प्रयोग

प्रयोगजीवी कलांसाठी आणि विशेषतः नृत्यासाठी एक प्रयोगशाळा असावी, जिथे प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्या शैक्षणिक आयामासंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन होणारे नवनवीन प्रयोग करावेत, हा या प्रकल्पामागील हेतू आहे. पं. रोहिणी भाटे या कायमच आंतरशाखीय दृष्टिकोनातून नृत्याकडे पाहत असत. या प्रकल्पाच्या माध्यमातूनही नृत्याला केंद्रस्थानी ठेवत नृत्याचा इतर कलांशी असणारा संबंध, त्यातून नृत्यात कशाप्रकारे नवनिर्मिती या दिशेने प्रयत्न केले जाणार आहेत.

- परिमल फडके, सहाय्यक प्राध्यापक, नृत्य विभाग, ललित कला केंद्र

पं. रोहिणी भाटे यांनी पुण्यात शास्त्रीय नृत्य कलेचे बीज रोवले. त्यामुळे त्यांच्या नावे शास्त्रीय नृत्यविषयक संशोधन प्रकल्प सुरू होणे, ही एका अर्थाने त्यांना दिलेली मानवंदना आहे. पुण्यात शास्त्रीय नृत्यविषयक विपुल काम होते. परंतु, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. या संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने शैक्षणिकदृष्ट्या त्यासाठी पहिले पाऊल पडणार आहे. यानिमित्ताने जगभरातील तज्ज्ञ अभ्यासासाठी इथे येतील.

- पं. शमा भाटे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com