Pune | निवाऱ्याचा हक्क हिरावता येणार नाही; मेधा पाटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवाऱ्याचा हक्क हिरावता येणार नाही; मेधा पाटकर
निवाऱ्याचा हक्क हिरावता येणार नाही; मेधा पाटकर

निवाऱ्याचा हक्क हिरावता येणार नाही; मेधा पाटकर

कोथरूड - संविधानाची शपथ घेऊन अधिकारीपदाचा स्वीकार करतात. पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत. श्रमिकांच्या श्रमाचे मोल नाही आणि हक्काला दाद नाही म्हणून आम्ही ‘घर बचाव आणि घर बनाव’ची घोषणा दिली. संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. हे अधिकार कोणालाही हिरावता येणार नाहीत. न्यायाच्या या लढाईत मी तुमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी भीमनगर येथे केले.

डीपी रस्त्याच्या विकासासाठी ज्यांची घरे पाडण्यात आली, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पाटकर या कोथरूडमधील भीमनगर येथे सुनिती सु. र., ज्ञानेश्वर शेडगे, पूनम कनोजिया या कार्यकर्त्यांबरोबर आल्या होत्या. येथील रहिवाशांचे प्रश्न समजून घेत पाटकर यांनी संवाद साधला. लखीमपूरच्या सीमेवर हुतात्मा झालेल्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. देविदास ओव्हाळ, जावेद शेख, नेहा गायकवाड, मंगल कांबळे, रेश्मा पल्ला, सोनाली पोळ, वैशाली साळवे, आक्काबाई तोरडमल, सुभद्रा तोरडमल, रईसा शेख, वर्षा डेंगळे, सोजरबाई खरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा: आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरू

त्यांना जर विकासकामे करायची होती, तर इतके दिवस काय करत होते. विकासासाठी वस्तीतील लोकांची सहमती घेतली का? त्यांना नियोजन आराखडा दाखवला का? असा प्रश्न करत पाटकर म्हणाल्या, ‘‘लोकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. दरसहा महिन्यांनी एक वार्डसभा घेणे बंधनकारक आहे. पण अशा सभा होत नाहीत. तुम्ही वार्डसभेसाठी आग्रही रहा. जर त्यांनी सभा घेतल्या नाहीत तर त्यांचे पद जाईल. क्षेत्रसभेमध्ये तुमचे म्हणणे मांडा.’’

स्थलांतरासाठी आमच्यावर दबाव

आकाश शिंदे म्हणाले, ‘कायद्यानुसार आमचे योग्य पुनर्वसन व्हायला हवे. वीज, पाणी, रस्ता, सुरक्षाभिंत, गेट, लिफ्ट आदी सुविधा नसतील तर आम्ही तेथे कसे रहायला जायचे? तेथे रहायला जा, असा आमच्यावर दबाव आणला जातो.’ बाल तरुण मंडळ या वस्तीतील दिव्यांग असलेले संजय बनपट्टी म्हणाले, ‘आमची वस्ती घोषित झोपडपट्टी आहे. आम्ही आमच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ मागतोय; पण अधिकारी आम्हाला वेळ देत नाहीत.

loading image
go to top