बारामती रिंग रोड दुरुस्तीचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

शहरातील रिंग रोडच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, खराब झालेल्या सर्व रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्ते विकास मंडळाच्या माध्यमातून बारामती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी रिंग रोडची निर्मिती करण्यात आली. 

बारामती : शहरातील रिंग रोडच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, खराब झालेल्या सर्व रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्ते विकास मंडळाच्या माध्यमातून बारामती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी रिंग रोडची निर्मिती करण्यात आली. 
गेल्या काही वर्षात या रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरुपात व काही भागापुरतीच झालेली होती. पावसाच्या जास्त प्रमाणामुळे अनेक ठिकाणी रिंग रोड खचलेले होते. काही ठिकाणी या रस्त्यावरील पावसाचे साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी सुविधाच केलेली नसल्याने अशा विशिष्ठ ठिकाणचे रस्ते खचले होते. यामुळे पर्यायी रस्ता वापरणाऱ्या नागरिकांचे कमालीचे हाल होत होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. 
ही बाब विचारात घेऊन तीन कोटी रुपयांच्या डांबरीकरणाच्या कामास रस्ते विकास मंडळाने मंजूरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात जेथे रिंग रोड अधिकच खराब झाला आहे त्या ठिकाणी रस्ता तयार करण्याच्या कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. यामध्ये चार रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, संपुर्ण रस्ता खड्डेविरहीत होईल या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या संदर्भात 'सकाळ'ने वेळोवेळी बातम्या देऊन या विषयाचा पाठपुरावा केला होता. 

 

Web Title: ring road repair work started in baramati